पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{(७२)) हिंदुस्थानापासून त्यांना जो फायदा होतो तो केवळ तिस-या प्रकारचा, म्हणजेन व्यापारासंबंधाचा होय. ह्या व्यापाराचं महत्त्व समजण्यासाठीं ब-याच आंकड्यांची घडामोड करावी लागणार आहे. हे आंकडे होतील तितक्या सुलभ व ठोकळ रीतीनें विचारांत घेऊं. इ. स. १८१४पर्धेत हिंदुस्थानाशीं व्यापार करण्याची सनद फक्त ईस्त इंदिया कंपनीलाच होती. हिंदुस्थानच्या त्या वेळीं व्यापार फारच थेोडा होता. व्यापारीची श्रेंजरसी अथवा आइल आफ मॅनबेटाबरोबर वृद्धि. जेवढा इंग्लंदचा व्यापार हल्लीं चालतो तेवढाच तो होता, असें म्हटलें तरी चालेल, तसेंच हिंदुस्थानांतील लोकांच्या रितीभाती इतक्या ठाम आहेत कीं, युरोप खंडांत तयार झालेले पदार्थ ते कधीहि खरेदी करणार नाहींत, असा त्या वेळचा अजमास होता. इ. स. १८१४ पासून व्यापार करण्याची सर्वांस मुभा मिळाली; व पुढच्या २०वर्षांत हा व्यापार १८,००,००,००० रुपये किंमतीपर्यंत, म्हणजे कानडा देशाशीं त्यांचा जितका व्यापार हल्लीं चालत आहे तितका, जवळ जवळ येऊन ठेपला. ही वाढ सर्व जगास आश्चर्यकारक वाटली, परंतु तो केवळ आरंभच होता. इ. स. १८८४त हिंदुस्थानाशाँ एकंदर व्यापार १,९४ ०;० ° ०० ०० रुपयांचा

  • ह्या बेटांपैकीं पहिलें इंग्लंदच्या दक्षिणेस इंग्लिश चानलमध्यें आहे, व दुसरें इंग्लंदच्या पश्चिमेस ऐरिश समुद्रांत आहे.

V9