पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७४)


झाला; म्हणजे ५० वर्षांत सुमारें ८ पट वाढला.आ- तां इंग्लिश व्यापाराची त्यांच्या देशांत जी वृद्धि झाली ती त्यांना फार विलक्षण वाटते.परंतु हिंदुस्थानांत जितकी वृद्धि होण्यास ५० वर्षे लागलीं, तितकी इंग्लं- दांत होण्यास ६० वर्षे लागली आहेत.

हिंदुस्थानच्या हल्लींच्या व्यापाराकडे आतां आ- पण लक्ष देऊं. ग्रेट ब्रिटन व आयर्लंद ह्यांमधून दरसाल जे जिन्नस हल्लीं बाह्य प्रदेशीं जातात, त्यांची एकंदर किंमत हल्लींचा येथील सुमारें २,४०,००,००,००० रुपये होते; व फक्त हिंदुस्थानांत जे पदार्थ व्यापार.येतात, त्यांची किंमत सुमारें ३२,००,००,००० रुपये होते;८ म्हणजे - पेक्षां जास्त होते. म्हणजे युनायतेद स्तेत्सशीं जो व्यापार चालतो, त्यापेक्षां हा व्यापार५,००,००,०० रुपयांनीं जास्त आहे; व आस्त्रेलियाशीं जो चालतो, त्यापेक्षां त्याच्याच - नें जास्त आहे.३

ह्या व्यापाराचे मुख्य जिन्नस कापसाचें कापड,इंग्लंदाहून येथें धातु, यंत्रे, आगगाडीचें सामान, लोंकरीचे पदार्थ, व दगडी कोळसा, हे होत. येणारे व्यापारा- इ. स. चे मुख्य जिन्नस ह्यांतहि मुख्य जिन्नस कापसाचें कापड. १८८२ | ८३त लांकाशायरमधून एकंदर ७६,००,००,००० रुपये किमतीचें कापड बाह्य प्रदेशीं रवाना झाले;यापैकी फक्त हिंदुस्थानांत २५,००,००,००० रुपयांचें आलें, म्हणजे लांकाशायरच्या सर्व मालापैकी