पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६९ )

आल्याप्रमाणेंच होईल; आणि अशा स्थितीतहि जर रशियन लोक अफगाणिस्थानांतील खिंडींतून हिंदुस्थाना- वर हल्ला करण्यास येऊं लागले, तर त्यांच्या सैन्याच्या अघाडीवर इंग्लिश फौजेचा मारा होऊन पिछाडीवर ह्या अफगाणांच्या टोळ्यांचे निर्दयपणाचे हल्ले होतील. ह्याव - रून पराक्रमी अशा अफगाण लोकांशीं स्नेहभाव ठेवणें इंग्लिंशांस किती आवश्यकतेचें आहे, हें सहज ध्यानीं येईल; व म्हणूनच अफगाण लोक आपले हल्लीं स्नेही आहेत, ह्याबद्दल त्यांना आनंद मानण्यास हरकत नाहीं: ह्यास्तव हिंदुस्थान कबज्यांत ठेवण्यासाठीं अफगाणिस्था- नाशीं स्नेह ठेवण्याचें जोखीम त्यांच्यावर येतें.
  दुसरी गोष्ट हिंदुस्थानांत इंग्लंदाहून जाण्यायेण्याचा रस्ता खुला ठेवणें, ही होय. ह्याच संबंधानें ह्या रस्त्याचा मध्यभाग सुएझचा कालवा सुएझच्या का- लव्याचें महस्व. होय. सुएझ कालव्यापर्यंतच्या इंग्लिशांच्या रस्त्याचें संरक्षण जिब्राल्टर व माल्टा ह्यांच्या योगानें हल्ली होत आहे. ह्या रस्त्यानें सुएझच्या कालव्यांतून तांबड्या समुद्रांतून एडनपर्यंत व तेथून सिंधु नदीच्या मुखाशीं असलेल्या कराचीपर्यंत इंग्लिशांना जोंपर्यंत सुर- क्षितपणे येतां येईल, तोंपर्यंत हिंदुस्थानच्या सरहद्दीवर त्यांना इंग्लंदाहून ३ आठवड्यांत सैन्य पाठवितां येईल. रशियाला युरोपांतून अफगाणिस्थानच्या सरहद्दीवर सैन्य पाठविण्यास जो काळ लागणार त्यापेक्षां वरील