Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७० )

काळ फार कमी आहे. म्हणून सुएझचा कालवा चांगल्या स्थितींत असून जाण्या येण्यास खुला आहे, तोंपर्यंत सैन्य नेण्या आणण्याच्या संबंधानें रशियापेक्षां इंग्लिशांस जास्त सवलत राहणार आहे; परंतु त्यांनीं सुएझ कालवा जर शत्रूंच्या हातीं जाऊं दिला, अथवा त्याचा नाश होऊ दिला, [ आणि असा नाश अंदाधुंदीच्या वेळीं त्याजकडे लक्ष न दिल्यास लवकरच होईल, ] तर मग त्यांना केप आफ गुड होपच्या जुन्या रस्त्यानें सैन्य पाठविणें भाग पडेल; व असें झालें असतां त्यांच्यापेक्षां सरहद्दीचें ठिका- ण रशियास * अधिक जवळ होईल.
 हिंदुस्थान ताब्यांत असल्यामुळे इंग्लिशांवर काय जबाबदारी आली आहे, त्याजबद्दल थोडी हकीगत आतां - पर्यंत सांगितली. अफगाणिस्थान आपणांस अनुकूळ राहील असें करणें, व सुएझच्या कालव्याचें स्वातंत्र्य व हिंदुस्थानापासून इंग्लंदा- स फायदे काय आहेत? सुरक्षितपणा सदोदित कायम राखणें ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टींची जबाबदारी हिंदुस्थान ताव्यांत असल्यामुळे त्यांच्यावर पडली आहे, असे वर स्पष्ट करून दाखविलेंच आहे. परराष्ट्रांशीं त्यांचे जे बखे- डे उत्पन्न होतात, त्यांपैकी बहुतेक वरील २ जबाबदा- यांमुळेंच उत्पन्न होतात; व म्हणून ह्या गोष्टी अगदीं


  • मध्य एशियांतील शियन रेलवेचें काम दिवसें दिवस वाढत चाललें असल्यामुळे, जेव्हां कधीं लढाईचा प्रसंग येईल तेव्हां, रशियाला इंग्लिशांपेक्षां सरहद्दीवर सैन्य आणण्यास किती काळ कमी लागेल, तें आजच नक्की ठरविणें अशक्य आहे.