अशासाठीं कीं तसाच प्रसंग आल्यास इंग्लंदाहून आणिलेल्या सैन्यास सरहद्दीच्या अगदीं नजीकच्या वंदरांत उतरून ताबडतोब धोक्याच्या ठिकाणीं नेतां यावें.
हिंदुस्थानच्या संरक्षणाच्या कामीं इंग्लिशांस यश येणें मुख्यत्वें दोन गोष्टींवर अवलंबून आहे. ह्यांपैकीं पहिली गोष्ट अफगाणिस्थानाशीं त्यांचा संबंध, ही होय. त्या देशांतून
ह्या संरक्षणा संबं- आल्याशिवाय रशियन लोकांस हिंदुस्थानांत येतांच येणार नाहीं.
धाने अफगाणि- एक तर ह्या कामीं त्यांस अफगाण लोकांचें साहाय्य मिळालें पाहिजे;अथवा
स्थानाचें महत्त्व. अफगाण लोकांशीं लढाई करून आपला रस्ता त्यांना जबरीनें खुला करून घेतला पाहिजे. रशियाच्या मनांत स्वारी करण्याचें आल्यास त्याला लढाई करण्याचाच प्रसंग यावा, असा इंग्लिश सरकारचा हेतु असून त्या धोरणानेंच त्यांची कारस्थानं हल्लीं सुरू आहेत; म्हणजे अफगाणिस्थानच्या अमिराशीं जितका मित्रभाव ठेववेल, तितका ठेवण्याची खटपट आहे. अफगाण लोक जर रशियास अनुकूळ झाले तर त्यांना १,oo,ooo सैन्य आयतेंच मदत मिळाल्याप्रमाणें होईल. हे अफगाण लोक लिचेपिचे नसून ज्यांनीं पूर्वी दोनदां हिंदुस्थान जिंकिलें अशा लोकांचे हे वंशज होत. आतां अफगाण लोक प्रतिकूळ असतांहि जर रशियन लोक ह्या देशांत शिरतील तर ते रानटी अफगाण लोक इंग्लिशांच्या बाजूस
पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/70
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६८ )