पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( . ) इंग्रजी पुस्तकाच्या व-याच भागाचें भापांतर माझे पूरलोकवासी बंधु ती. रा. रा. रामचंद्र वासुदेव नाटेकर ह्यांनीं केलें होतें; राहिलेल्या भागाचें भापांतर माझ्या हातून झालें आहे. आधी मराठी भाषेत उपयुक्त पुस्तकोची उणीवः व तशातहि जी थोडी वहत होतात त्यांना बाचकांची उणीव. पुस्तकांची उणीव नाहींशी व्हावी म्हणून आपल्या युनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सेलर डा, रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच दिवसांपूर्वी ' डेक्रन व्हर्नाक्युलर सोसायटी' नांवाची संस्था स्थापित झाली अाहे. वाचकांची उणीव नाहिशी होण्याचा सृदिन ... - कधीं येईल तो येवो. कित्येक विद्वानांनीं ह्या पुस्तकाचा हस्तलेख वाचून व कित्येकांनीं ह्याचे ग्रूफ वाचून जे अभिप्राय दिले ते पुस्तकाच्या शेवटीं छापिले आहेत. ह्या सर्वांचे व ज्या दुसध्या क्रित्येक मित्रांनीं उपयुक्त सूचना केल्या त्यांचे अत्यन्त आभार मानिॉ. . वि. वा. नाटेकर. ठाणे. त. १।२।९९... ~ | NA त. ?|2९ हङमस्तिरः, २ifZ टाण न्. 2