Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४ )


पुस्तकांतील संबंध मराठी वाचकांस समजण्यास अवघड आहे असे वाटले, तेथे स्पष्टीकार्णार्थ टिपा दिल्या आहेत. ब्रिटीश अमलातील एकंदर वसाहती व देश ही प्रारंभी एका ठिकाणीं दिली आहेत. मूळ पुस्तकांत प्रथम वसाहतींसंबंधी दोन प्रकरणे असून नंतर हिंदुस्थानासंबंधी दोन प्रकरणे आहेत; परंतु हिंदुस्थानासंबंधी प्रकरणे वाचकांस विशेष सुलभ व मनोरंजक वाटण्याचा संभव असल्यामुळे ती येथे प्रथम दिली आहेत; व ह्या फरकाच्या अनुरोधानेच पुस्तकाच्या नावातही थोडा फरक केला आहे. वसाहतींसंबंधी प्रकरणांचा आपल्या देशाशीं साक्षात् संबंध नसल्यामुळे तीं वाचकांस विशेष महत्त्वाचीं वाटणार नाहींत; तथापि ज्या ब्रिटिश राप्ट्रांत आपण सांप्रत राहत आहों, त्याचा विस्तार कसकसा होत गेला, व सांप्रत केवढा आहे, ह्याविषयीं थोडी बहुत माहिती सर्वांस असणे आवश्यक आह, असें कोणीहि काबुल करील. ह्या वसाहतींसंबंधी प्रकरणांतील पहिल्या प्रकरणांत इंग्लंदच्या इतिहासाचा पुष्कळ ठिकाणी संबंध आला असल्यामुळे बरेच ठिकाणीं टिपा देऊन तो भाग सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत काळी इंग्लंदच्या इतिहासाची थोडी बहुत माहिती मराठी वाचकांसहि असणें इष्ट दिसतें; व ट्रेनिंग कॉलेजाच्या अभ्यासक्रमांत अलीकडे हा विषय सामील करण्याचाहि हेतू हाच असावा.