पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६२ )

रभाराचा पाया म्हटला म्हणजे हा जिल्हा होय. निल्ह्यावरील मुख्य अधिका-याला जमाबदी संबंधानें कलेक्टर व फौजदारी संबंधानें डिस्ट्रिक्ट माजिस्ट्रेट म्हणतात. पूर्वी ह्या कामगाराचें मुख्य काम फक्त जमिनीचा वसूल गोळा करण्याचें असे, व तेव्हांपासून कलेक्टर हा हुद्दा चालत आला आहे. कलेक्टर हा हिंदुस्थानांतील राज्यसूत्रांचा आदि चालक होय. प्रत्येक जिल्ह्यांतील प्रदेशाचा विस्तार कमजास्त असतो; परंतु त्यांतील लोकसंख्या साधारणपणें १० लक्षांपेक्षां जास्त असते; व ह्या सर्वांवर कलेक्टरचा व त्याच्या हाताखालच्या अंमलदारांचा पूर्ण अंमल असतो.
 हिंदुस्थानची राज्यपद्धति इंग्लंदच्या राज्यपद्धतीहून फार भिन्न आहे. परराष्ट्रानें हल्ला केल्यास संरक्षण करणें, व न्यायाची कोर्टे चालविणें, इतकींच काय तीं सरकारचीं कामें आहेत, असें इंग्लिश लोकमानितात, इतर कोणत्याहि कामांत सरकारची मदत ते मिळवूं इच्छित नाहींत. सर्व प्रकारची स्थानिक स्वराज्याची व्यवस्था त्यांची तेच करितात. तसेंच तेथील शहरांच्या म्युनिसिपालिट्यांच्या कौन्सिलरांची ( सभासदांची ) निवड ते लोकच करितात; आणि ते सभासद नंतर मेयरची (प्रेसिडेंटाची ) निवड करितात. हे शहरचे सभासद शहरांतील कामकाजांच्या व्यवस्थेकरितां आपल्यांतीलच कित्येकांची एक पोट कमिटी नेमितात.