पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५८)

केली असतां जी संख्या होणार तिजपेक्षांहि ह्या संस्था- नाची लोकसंख्या जास्त आहे. म्हैसूर हेंहि एक महत्त्वाचें संस्थान आहे; त्याची राजधानी म्हैसूर शहर आहे. ह्या संस्थानची लोकसंख्या ४०,००,००० म्हणजे स्कातलंदा- पेक्षां जास्त आहे; व आणखी दुसरी ८ मोठाली संस्थानें असून त्यांतील प्रत्येकाची लोकसंख्या १०,००,००० वर आहे. हे राजे व्हाइसराय साहेबास भेटावयास जातात, तेव्हां त्यांच्या सन्मानार्थ ज्या तोफा झडतात, त्या तोफां- च्या संख्यांच्या प्रमाणानेंच ह्यांचे मानमरातब असतात. ह्यांचें राज्य ह्यांच्या वंशांकडे चिरकाळ चालविण्याविषयीं ब्रिटिश सरकारचें ह्यांना अभिवचन असतें; तथापि ह्यांनीं आपल्या मुलखांत कांहीं एक नियमित प्रमाणानें उत्तम प्रकारची राज्यव्यवस्था ठेविली पाहिजे, असा बोजा ह्यांच्या शिरावर असतो. ह्याप्रमाणे चांगल्या प्रकारची राज्यव्यवस्था न ठेविल्यामुळे कित्येक राजांना पदच्युतहि करण्यांत आले आहे. ह्या सर्व नेटिव्ह संस्थानांतील लेक संख्या सुमारें ५ कोटि म्हणजे जर्मनीतील लोकसंख्येपेक्षां


  • हिंदुस्थानांतील मुख्य मुख्य संस्थानिकांना सन्मानार्थ ज्या

तोफा आहेत, त्या पुढे लिहिल्याप्रमाणेंः-- बडोदें २१; हैदराबाद ( निजाम ) २१; म्हैसूर २१; भोपाळ १९; काश्मीर १९; ग्वाल्हेर १९; इंदूर १९; कोल्हापूर १९; मेवाड १९; त्रावणकोर १९; भावलपूर १७; भरतपूर १७ आणि विकानेर १७. शिवाय खुद्द राणी सरकारास १०१, गव्हर्नर जनरल (व्हाइसराय ) यांस ३१, मुंबई व मद्रास येथील गव्हर्नरांस १७ व बंगाल, वायव्य प्रांत आणि पंजाब येथील लेफ्तेनेंत गव्हर्नरांस १५ तोफा आहेत.