पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५९ )

जास्त आहे. म्हणून राणी सरकारच्या प्रत्यक्ष अमलाखालीं असणारी लोकसंख्या सुमारें २० कोटि राहिली.
 हिंदुस्थानचा राज्यकारभार समजून घेणें फार घोटाळ्याचें आहे. कंपनीची राज्यपद्धति व
इंग्लिश राज्यपद्धति ह्यांच्या संमेलनामुळें हा घोटाळा झाला आहे. ह्यांतील महत्त्वाच्या गोष्टी पुढे थोडक्यांत
हिंदुस्थानची सांगितल्या आहेत. इंग्लिश राज्यपद्धतीच्या नियमाप्रमाणें हिंदुस्थानासंबंधी सर्व
राज्यपद्धति राज्याधिकार राणी आपल्या एका प्रधानाच्या द्वारें चालविते; व एकंदर राज्यकारभाराबद्दल ह्या प्रधानाला पार्लमेंट सभा जबाबदार धरिते. ह्याला *सेक्रेटरी ऑफ् स्टेट फॉर इंडिया' (हिंदुस्थानचा स्टेट सेक्रेटरी ) म्हणतात. हा इंग्लंदच्या मंत्रिमंडळामध्यें ( क्याबिनेटमध्यें ) असावयाचाच. स्टेट सेक्रेटरीस मदत करण्याकरितां एक कौन्सिल म्हणजे मंत्रिसभा असते. हिंदुस्थानासंबंधी कामकाजांचा ज्यांना अनुभव असतो, असेच सभासद ह्या सभेंत असतात; व त्यांची नेमणूक राजाकडून होते. परंतु त्यांच्या अभिप्रायाप्रमाणें वागलेंच पाहिजे, असें बंधन स्टेट सेक्रेटरीवर नाहीं. त्याच्या मर्जीस वाटेल तेव्हांच तो ह्या सभासदांच्या अभिप्रायाप्रमाणें चालतो.
 राणी सरकारचा हिंदुस्थानांतील प्रतिनिधि व्हाइसराय हा होय. ज्या पक्षाच्या प्रधानमंडळाकडे अधिकार असतो, त्या पक्षाच्या मताप्रमाणेंच बहुधा अलीकड़े व्हाइसराय राज्यकारभार पाहतो, म्हणजे लिबरल पक्षाचें