पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५७)

हिंदुस्थानांतील नेटिव्ह संस्थानें. प्रमाणे कित्येक प्रांतांवर नामधारी राजे ठेवून त्या प्रांतांचा राज्यकारभार कंपनीनें आपल्याकडे घेतला होता. कित्येक नेटिव्ह संस्थानिकांबरोबर तिनें तह केले होते. आपल्या पदरीं मोजकें सैन्य ठेवणे, परराष्ट्रांशी सल्ला मसलत न करणें, ब्रिटिश सरकारची सल्ला मसलत घेण्या- साठी ब्रिटिश रेसिवेंत आपल्या दरबारी ठेवणें, व कधीं कधीं खंडणी देणें, इत्यादि गोष्टी ह्या तहांत ठर- लेल्या होत्या. हाच कंपनीचा क्रम १८५८ नंतर इंग्लिश सरकारानेंहि चालू ठेविला; आणि १८७७त राणीनें “ बादशाहीण" ( एंप्रेस ) अशी पदवी स्वीकारिल्यामुळे सर्व नेटिव्ह संस्थानिकांत ती प्रमुख झाली; मग तीं संस्थानें प्रत्यक्ष इंग्लिश सरकारच्या ताव्यांत असोत वा नसोत.

 नेटिव्ह संस्थानें हल्लीं हिंदुस्थानांत सुमारे १००० असून त्या सर्वांची मिळून हिंदुस्थान सरकारास सालीना सुमारें७२,५०,० ० ०रुपये खंडणी मिळत आहे. तसेच ह्या सर्व संस्थानिकांचें एकंदर सैन्य ३,८१,००० आहे. ह्या सर्व संस्थानांत महत्त्वाचें संस्थान हैदराबादच्या निजा- माचें होय. हें संस्थान इंग्लिश सरकारास सैन्याची मदत देण्यास नुकतेंच इ. स. १८८१त तयार झाले होतें. निजामाच्या राज्यांत १ कोटीवर लोकसंख्या आहे. म्हणजे आयर्लंद व स्कातलंद ह्यांची लोकसंख्या एकत्र