पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७ )

पोर्तुगाल, नॉर्वे व स्वीडन ह्यांसारख्या देशांची गोष्ट सोडूनच द्या; परंतु युरोपांतील मोठालीं सर्व राष्टें–ग्रेट ब्रिटन व आयर्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, ऑस्त्रीया व तुर्कस्थानहीं एकत्र केलीं असतां जो प्रदेश होईल, त्यापेक्षांहि हिंदुस्थान देश मोठा आहे, असें समजलें पाहिजे. तेव्हां हिंदुस्थानावरील इंग्लिशांची राज्यसत्ता म्हणजे रशियाशिवाय राहिलेल्या युरोपावरील त्यांची राज्यसत्ता असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं.
 आतां हिंदुस्थान देश आकारानें जरी जवळ जवळ युरोपाइतका आहे, तरी इतर बाबतींत युरोपाहून फार भिन्न आहे. फ्रान्स, जर्मनी व स्पेन ह्यांसारखे पुष्कळ देश युरोपांत आहेत. ह्या प्रत्येकांत जे लोक राहतात ते सर्व एकच भाषा बोलतात; आणि त्यांच्या रितीभाती सारख्या असून धर्मेहि बहुतांशीं एकच आहे. जर्मनी किंवा फ्रान्स ह्यांतील प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणीं स्वदेशप्रीति असते; जरूर पडल्यास स्वदेशासाठीं लढण्यस तो तयार असतो; आणि रशियन लोक किंवा स्पेन देशांतील लोक ह्यांना स्वदेशावर स्वारी करण्यास मदत करण्याचें त्याच्या कधीं स्वप्नीही येत नाही.
जाती भाषा आणि धर्म
 हिंदुस्थानांत अशा प्रकारची स्थिति आढळावयाची नाही. येथील स्थिति कशी आहे ह्याची कल्पना होण्यास अगदी साधे उदाहरण घेतले पाहिजे. सर्व युरोप खंडास एकाएकी मोठा थोरला धक्का बसला,