पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६ )

सिंधूच्या काठच्या प्रदेशांत बहुतेक पंजाब येतो; गंगेच्या कांठच्या प्रदेशांत बंगाल येतो; आणि डेक्कनमध्यें दक्षिण हिंदुस्थानांतील प्रदेश म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेकडील सर्वे प्रदेश येतो. हिंदुस्थानांत अति महत्वाचें शहर दिल्ली. गंगेस मिळणारी जी यमुना नदी तिच्या कांठीं हें शहर असून गंगेचें मुख व सिंधूचें मुख ह्या दोहोंपासून सरासरी सारख्या अंतरावर मध्यावर आहे. दिल्ली शहर कोठं वसलें आहे ती जागा व हे ३ भाग जर लक्षांत ठेविले, तर हिंदुस्थानच्या इतिहासाविषयीं जें कांहीं पुढें सांगावयाचें आहे तें सहज समजेल. हिंदुस्थानची रचना कशी काय आहे त्याविषयीं आतां विचार करूं. साधारणपणें पाहिलें असतां युरोपांतल्यापेक्षां एशिया खंडांतील प्रत्येक गोष्ट फार अवाढव्य आहे. आलूप्स् पर्वत जितका उंच आहे त्याच्या दुप्पट हिमालय पर्वत उंच आहे. हिंदुस्थानांतील नद्याहि युरोपांतल्या नद्यांपेक्षां अधिक लांब रुंद आहेत; व मैदानें जास्त विस्तीर्ण आहेत.
त्याच्या क्षेत्रफळाचा अजमास
एशिया खंडांतील इतर कित्येक देशांशीं तुलना करून पाहिलें असतां हिंदुस्थान देश अगदीं लहान दिसतो; तरी युरोपाशीं तुलना केली असतां तो फार विस्तीणे देश आहे, असें ध्यानांत येईल. फार कशाला, युरोप खंडांतून रशिया गाळला असतां जो कांहीं प्रदेश उरेल, तेवढाच आकार अजमासें हिंदुस्थानाचा आहे. ह्यासाठीं फारच क्षुल्लक अशा ग्रीस, स्वित्झरलंद,