पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )

हिंदुस्थानचा आकार
हिंदुस्थान हे नाव आहे. ह्याच्या पूर्व पश्चिम दोन बाजू दक्षिणेकडे एकमेकीस एका बिंदूंत येऊन मिळतात, व ह्यांच्या योगानें जे भूशिर होतें त्याला केप कामोरिन म्हणतात. उत्तरेकडे जेथें त्या बाजू संपल्या आहेत त्या ठिकाणीं पर्वतांची एक अवाढव्य रांग आहे. हे पर्वत पूर्वेकडून पश्चिमेकडे वक्ररेषेनें गेले आहेत; व एशिया खंडांतील इतर देशांपासून हिंदुस्थानास निराळे करण्यास हे एक प्रकारची भिंतच झाले आहेत. ह्या पर्वतांच्या ओळीस हिमालय पर्वत म्हणतात. हिंदुस्थानचे स्वाभाविकपणें ३ भाग झाले आहेत. सिंधु आणि गंगा ह्या दोन मोठ्या नद्यांचे उगम हिमालयात असून पहिली आरबी समुद्रास व दुसरी बंगालच्या उपसागरास मिळते. सिंधु व तिला मिळणा-या नद्या ह्यांच्या योगानें ज्या प्रदेशास पाणी मिळतें तो प्रदेश पहिल्या भागांत येतो; आणि गंगा व तिला मिळणाच्या नद्या ह्यांच्या योगानें ज्या प्रदेशास पाणी मिळतें तो दुस-या भागांत येतो. ३ रा भाग त्रिकोणाकृति असून त्याच्या दोन बाजूस समुद्र आहेत; आणि सिंधु नदीच्या मुखाच्या किंचित् दक्षिणेपासून त्याच्या समोरच्या किना-यापर्यंत रेषा ओढिली असतां त्या त्रिकोणाचा पाया निघतो. तेव्हां हे ३ भाग म्हणजे, सिंधूच्या कांठचा प्रदेश, गंगेच्या कांठचा प्रदेश, व "डेक्कन" (दक्षिण) हे होत.