पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६३)


समूहाला कित्येक वर्षे पुरेल इतकी उत्तम जागा ब्रिटिश वसाहतींमुळे झाली आहे. तसेच हल्लींच्या वस्तुस्थितीकडे लक्ष दिलें असतां युनाय्तेद स्तेत्समध्ये न जातां ह्या लो- कांनी ब्रिटिश वसाहतींतच राहण्यास जावें; म्हणून त्या वसाहतींतील लोकांच्या मनांतील इंग्लिशांविषयींचें प्रेम त्यांनी कायम राखणे, ही गोष्ट ब्रिटिश व्यापारास अत्यन्त महत्त्वाची आहे.

 वसाहतीमुळे इंग्लिशांचें सामर्थ्य वाढतें, म्हणजे त्यांना राजकीय महत्त्वहि प्राप्त होतें, हा त्यांचा शेवटचा म्हणजे ३रा उपयोग होय. लहान लहान राष्ट्रे मोडून वसाहतींमुळे इंग्लि- त्यांची हळ हळ मोठालीं राष्ट्र बनत शांचें स.मर्थ्य वाढतें. चालली आहेत, असें इतिहासा वरून दिसून येतें; म्हणून युरोपांतील राष्ट्रांच्या योग्यतेची तुलना त्यांच्या फक्त युरोपांतील विस्तारावरून हल्लीं कोणी करीत नाहीत, तर पृथ्वीवरील त्यांच्या विस्तारावरून करितात, असे पूर्वी लिहिलंच आहे. शिवाय, ब्रिटिश राष्ट्र, रशिया आणि युनायुतेद् स्वेत्स ह्यांसारखी विस्तृत राष्ट्रच पुढील काळी महत्त्वाचीं बनतील असेंही उपड आहे. तसेंच ह्या मोठाल्या राष्ट्रापैकी रशिया व युनायूतेद स्त्स ह्यांसारख्या राष्ट्रांचा कल व्यापाराचे संगोपन करण्याकडे दिसत असल्यामुळे लहान लहान राष्ट्रांची स्थिति हळू हळ अधिकाधिक भयंकर होत जाईल; कारण ती राष्ट्र आणि त्यांचा व्यापार त्यांच्या फार बलाढ्य अशा ह्या शेजाऱ्यांवर अवलंबून राहणार आहे.