पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६२)

सोडून परदेशांत राहण्यास गेला अशी कल्पना केली; तर ह्यामुळे त्याची रिकामी जागा बला मिळते, एवढा एकच कांहीं फायदा नाहीं. आणखी दुसरा फायदा आहे, तो असा कीं, परदेशांत जाऊन तो जो पैसा मिळविणार त्या पैशानें इंग्लंदांत उप्तन्न होणारे जिन्नस मागविणार; व ह्यामुळे इंग्लंदांतील क मजुराला थोडा बहुत कामधंदा मिळणार. तेव्हां ज्या देशांत ब्रिटिश व्यापाराला बंदी नाहीं, अशा कोणत्याहि देशांत जर तो जाईल, तर वर लिहिलेले दोन्ही फायदे होतील. परंतु कोणत्या देशांत ब्रिटिश माल कोणत्या प्रमाणानें खपतो, ह्याविषयीं मागें जे आंकडे दिले आहेत, तिकडे लक्ष दिले पाहिजे; आणि तो कोणत्या देशांत जातो, तेहि इंग्लिशांस किती महत्त्वाचे आहे, तें ध्यानांत आणिलें पाहिजे. अशी कल्पना करूं की, क्षय आणि ज्ञ हे इंग्लंद सोडून परदेशांत राहण्यासाठी इंग्लंदाहून निघाले. क्ष युनाय्तेद स्तेत्समध्ये जात आहे; तेव्हां मागील प्रमाणाप्रमाणें तो इंग्लंदचा माल दरसाल १० शिलिंगांचा घेईल. य कानड्यामध्ये जात आहे; तो दरसाल २ पौंडांचा घेईल; व ज्ञ आस्त्रेलियांत जात आहे; तो दरसाल ८ पौंडांचा घेईल. तेव्हां इंग्लंदांतून जाणाऱ्या लोकांनी युनाय्तेद स्तेत्समध्ये न जातां ब्रिटिश वसाहतीतच राहण्यास जावें, ही गोष्ट इंग्लिशांच्या किती हिताची आहे, तें ध्यानांत येणार आहे.

 सारांश, वाढत चाललेल्या ब्रिटिश बेटांतील लोक-