Jump to content

पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६०)

जाणार असा अजमास आहे. शिवाय भिक्षक-यांची संख्या हल्लीं १६ लक्ष आहे, असेंहि माहीत आहे. तसेंच लंडन शहरांत व ब्रिटिश बेटांतील इतर मोठ मोठ्या शहरांत चांगले सशक्त लोक काम करण्यास तयार असतांहि त्यांना कामधंदा मिळत नाहीं, असेंहि आपण नेहमीं वाचित. तेव्हीं ह्या एकंदर स्थितीचा विचार केला असतां, ह्या फाजल लोकसमूहाची सोय लावणें हा प्रस्तुत काळीं इंग्लिशांपुढे एक फारच महत्त्वाचा प्रश्न आहे, असें म्हणावें लागतें.

 वाढत चाललेल्या लोकसमूहाला राहण्यासाठी वसाहतींची आवश्यकता आहे, असें प्राचीन काळच्यू लोकांस वाटत असे; इतकेंच नव्हे, तर १०० वर्षांमगि लोकांची अशीच समजूत होती, ह्यांत संशय नाही. अंगर्दी परकीय देशांत जाऊन राहणें लोकांच्या फार जिवावर येत असे; कारण तेथें कायदे नवे, धर्म नवा व कदाचित भाषाहि नवीनच; सारांश तेथें सर्व कांहीं नवें. ह्यामुळं त्य दुरच्या देशांत जाऊन राहणा-या मनुष्याला आप" अगर्दी परक्या ठिकाणीं येऊन पडलीं आहों, अमें मरेपर्यत वाटावयाचें. युनाय्तेद स्तेत्स हें ह्या संबंधानें अपवादक अॅम्ह; कारण इंग्लंदांतील भाषा तीच तेथील व इंग्लंदच्या राज्यव्यवस्थेच्या नमुन्यावरच थाडा बहुत तथाल राज्यव्यवस्थाह आहे. म्हणून त्या क हल्ली परक्याप्रमार्ण इंग्लादातून बाहेर राहण्यास नाणाया लाकाना ब्रिटिश वसाहतींशी टकर मारण्यात युनायूतद स्तत्स हर्लीं तयार आहे.