पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५९)

आहे; [ ४ ] पुढील काळांत मोठ मोठ्या देशांत जर व्यापाराचें संगोपन होऊं लागले, तर ब्रिटिश व्यापारा- पासून त्यांचे व त्यांच्या वसाहतींचें अधिकच हित होण्या- चा संभव आहे; आणि [६] मनोवृत्तींचा व्यापाराशीं पुष्कळ संबंध आहे; म्हणून ब्रिटिश सरकारानें एकंदर वसाहतींशीं व प्रत्येक वसाहतींतील लोकांशी चांगलें वर्तन ठेवणें हें फार महत्त्वाचें आहे; इतकेंच नाहीं तर इंग्लंदांतील लोकांनीहि त्यांच्यांशी चांगले वर्तन ठेवण्यास जपणें हें फार महत्त्वाचें आहें.

 वसाहतींच्या योगानें ब्रिटिश व्यापार वाढतो, हा जो त्यांचा पहिला उपयोग त्याविषयीं हें एवढें विवरण झालें. आतां मूळ देशांत वाढत चाललेल्या लोकसमूहाला राहण्यास जागा, हा जो त्यांचा दुसरा उपयोग त्याजबद्दल विचार करावयाचा. आतां शेतकरी जर सरकाराला आप- ला धारा देण्यांत कसूर करणार नाहीत, तर जोपर्यंत राहण्यास जागा शिल्लक आहे, तोपर्यंत ब्रिटिश लोक- वाढत चाललेल्या इंग्लिश लोक समू- हाला राहण्याकडे वसाहतींचा उपयोग. संख्या कितीहि वाढली तरी हरकत नाहीं, व तोंपर्यंत आपला चरितार्थ चालण्यासहि कांहीं अडचण पडणार नाहीं, असें मि. जार्ज ह्यांचे म्हणणे आहे. तथापि ह्या वाढत चाललेल्या लोकसमूहाची काय वाट लावावयाची ह्या प्रश्नास पुढे फार महत्त्व येईल, असे धोरण दिसत आहे.

 ब्रिटिश बेटांची लोकसंख्या ३,५०,००,००० आहे; व ही लोकसंख्या दर ३० वर्षांनी दुप्पट होत