पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४ )

लोकांनीं, ह्या लोकांना अगदीं मदत करावयाची नाहीं, इतका नुसता कट केला असता, तरी तेवढ्यानेंच ह्या लोकांना तेथें राहणें अशक्य झालें असतें. अशी वस्तुस्थिति असतांहि त्यांनीं तें मोठं द्वीपकल्प घेतलें, हें ऐकून तर अधिकच आश्चर्य वाटेल, असा वास्तविक प्रकार असून त्या बेटांतील लोकांना हें पराक्रमाचें कृत्य वाटत नसून ही एक साहजिक रीतीनेंच घडलेली गोष्ट वाटत होती, व म्हणून ह्या द्वीपकल्पासंबंधी प्रकरणांत ते फार थोडें मन घालीत असत, हें ऐकून तर पराकाछेर्चे आश्चर्य वाटेल.
 तथापि ज्या कांहीं गोष्टी वर सांगितल्या आहेत, त्या अक्षरशः ख-या आहेत. ग्रेट ब्रिटनआयर्लंड हींच तीं दोन वेटें; आणि हिंदुस्थान हेच तें द्वीपकल्प. ब्रिटिश बेटांच्या ११ पट ह्याचें क्षेत्रफळ असून ७ पट लो. सं. आहे, तसंच, दर दोन हजारी १ शिपाई, ह्याच प्रमाणानें ह्या महाद्वीपांत त्यांनी सैन्य ठेविलें आहे. हा सर्व प्रकार आश्चर्य वाटण्याजोगा नाहीं काय? आणि सर्व जगाच्याहि प्राचीन इतिहासांत ज्या स्थितीला साम्य सांपडावयाचें नाहीं, अशा प्रकारची ही स्थिति इंग्लिशांस कशी व कां प्रात्प झाली, ह्याचा विचार करणें इष्ट नाहीं काय?
 प्रथमतः हिंदुस्थानच्या आकाराविषयीं विचार करूं एशिया खंडाच्या दक्षिण किना-यावरील एका द्वीपकल्पाला