पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १३ )

हिंदूस्थान

आणि

ब्रिटिश वसाहती.

प्रकरण पहिलें

इंग्रज लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी ह्या देशाची

स्थिति कशी होती व येथील मुख्यसत्ता

त्यांनी कशी मिळविली.

  लहानशा दोन बेटांतील लोकांनी, आपल्या बेटांच्या ११ पट ज्या द्वीपकल्पाचे क्षेत्रफळ, आणि आपल्या बेटांतील लोकसंख्येच्या ७ पट जेथील लोकसंख्या, असें एक मोठे द्वीपकल्प जिंकिले; व सरासरीनें दर २००० जनक लोकसंख्येस १ शिपाई ह्या प्रमाणानें सैन्य ठेवून ते द्वीपकल्प आपल्या ताब्यांत ठेविलें; असें जर कोणीं सांगितलें तर त्या लोकांच्या धारिष्टाचें कोणालाहि आश्चर्य वाटणे साहजिक आहे. त्या द्वीपकल्पाची हवा अशी कांहीं चमत्कारिक होती कीं, तद्देशीय लोकांच्या मदतीशिवाय ह्या जिंकणा-या लोकांना तेथे राहतांच आलें नसते; म्हणून तद्देशीय