पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४९)

गोष्ट थोडीशी लागू पडते; पण हे लोक राजकीय संबं 'वावरून हा देश सोडून जातात ते कांहीं ब्रिटिश वसा- हतींत जात नाहींत; तर युनायतेद स्तेत्समध्ये जातात.

 लष्करी ठिकाणें बनविणें हा वसाहती स्थापण्याचा तिसरा उपयोग होय. रोमन लोकांनी आप- ल्या बहुतेक वसाहती ह्याच उद्देशानें लष्करी कामाकडे त्यांचा उपयोग. स्थापिल्या होत्या. आपल्या विरुद्ध असणाऱ्या लोकांवर आपला अंमल बसविण्यासाठी किंवा राष्ट्राचें मुख्य स्थान ( रोम ) व लांब लांबचे प्रदेश ह्यांचा संबंध कायम राखण्यासाठी त्यांनी ह्या लष्करी वसाहती मधून मधून स्थापिल्या होत्या. ह्या दोन उपयोगांपैकी पहिला-आप- ल्याविरुद्ध असणाऱ्या लोकांवर आपला अंमल बसवि ण्याकडे होणारा-उपयोग ब्रिटिश वसाहतींपासून त्यांना हल्ली होत नाहीं.

 लांब लांबच्या ठिकाणांशी संबंध राखणे हा ह्या लष्करी वसाहतींचा दुसरा उपयोग. अशा प्रकारचीं इंग्लिशांचीं फारशीं ठिकाणें नाहींत; जिब्राल्टर व माल्टा ह्रीं अशा प्रकारची आहेत. ह्यांच्या योगानें ज्या वसाह तींशीं किंवा ताव्यांतील देशांशी इंग्लिशांचें दळण वळण चाल राहतें, त्या वसाहतींच्या अगर देशांच्या महत्त्वा- वर ह्यांचे महत्त्व अवलंबून आहे, हे उघड आहे. म्हणून त्या वसाहती व ते देश ताब्यांत राखणे जर फायदेशीर असेल तर त्यांच्यांशी हे दळण वळण ज्या लष्करी