पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३ )



हिंदुस्थान
आणि
ब्रिटिश वसाहती.
प्रकरण पहिलें.
इंग्रज लोक हिंदुस्थानांत येण्यापूर्वी ह्या देशाची
स्थिति कशी होतो व येथील मुख्यसत्ता
त्यांनीं कशी मिळविली


उपोदघात
लहानशा दोन बेटांतील लोकांनीं, आपल्या बेटांच्या ११ पट ज्या द्वीपकल्पाचें क्षेत्रफळ, आणि आपल्या बेटांतील लोकसंख्येच्या ७ पट जेथील लोकसंख्या, असें एक मोठे द्वीपकल्प जिंकिले; व सरासरीने दर २००० लोकसंख्येस १ शिपाई ह्या प्रमाणानें सैन्य ठेवून ते द्वीपकल्प त्यांनी आपल्या ताब्यात ठेविलें; असें जर कोणीं सांगितलें तर त्या लोकांच्या धारिष्टाचें कोणालाहि आश्चर्य वाटणें साहजिक आहे. त्या द्वीपकल्पाची हवा अशी कांहीं चमत्कारिक होती कीं, तद्देशीय लोकांच्या मदतीशिवाय ह्या जिंकणा-या लोकांना तेर्थ राहतांच आलें नसतें: म्हणून तद्देशीय