पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४७)

प्रश्नाला त्यांचें उत्तर " आहे " असे होतें. हल्लीं इंग्लिशांना ज्या प्रश्नाचें उत्तर द्यावयाचें तो असाः - "आपल्या पूर्वजांनी मिळवून ठेविलेल्या ह्या वसाहती ता- व्यांत राखणे फायदेशीर आहे की नाहीं, व फायदे- शीर असल्यास हा हेतु साधण्यासाठी कोणते उपाय योजिले पाहिजेत? "

 वसाहतींची स्थापना करण्यास प्रारंभ करणें फाय- देशीर आहे कीं नाहीं, ह्या प्रश्नाचा फ्रेंच व जर्मन लोकांना हल्लीं विचार कर्तव्य आहे. इंग्लिशांस जरी तसा विचार करावयाचा नाहीं, तरी नवीन वसाहती स्थापन करण्यास फ्रेंच व जर्मन लोकांना जीं कारणे आहेत, तींच इंग्लिशांना मागील काळांत झालेले वसाहतीं- चे उपयोग. आपल्या जुन्या ताब्यांत राखण्यास कांहीं अंशानें तरी लागू पडतील, हें उघड आहे. म्हणून वसाहतींपासून कोणते उपयोग असल्यामुळे त्या स्थापन करण्यास प्रारंभ करण्याचें लोकांच्या मनांत आलें, आणि ते उपयोग ब्रिटिश वसाहतींपासून त्या लोकांना हल्डीं कितपत होत आहेत, ह्याजबद्दल विचार करणे इष्ट आहे. जे उपयोग त्यांना हल्लीं होत नाहीत, त्यांचाच विचार प्रथमतः करूं.

 कैदी पाठविण्यासाठीं वसाहतींची स्थापना हा त्यांचा एक उपयोग होय. न्यू साउथ वेल्स, नारफाक बेट, व तासमानिया ह्या वसाहती केवळ