पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४१)

वसाहतींचा विस्तार केवढा आहे, व वाढत चाललेल्या ब्रिटिश लोकसमूहाला पुढे हजारों वर्षेपर्यंत त्या वसा- हतींचा राहण्याला व कामधंद्याला केवढा उपयोग होणार आहे, ह्याची थोडीबहुत कल्पना ह्या उदाहरणावरून होईल, असे वाटतें.


आंकड्यांसंबंधानें इतकी माहिती पुरे आहे; म्हणून आतां दुसऱ्या विषयाकडे वळं. ब्रिटिश बेटांना ह्या वसाहतींशिवाय पृथ्वीवरील इतर कोणत्याहि देशाशीं व्यापार करण्याची मोकळीक नाहीं, अशी कल्पना करूं. असे झालें वसाहतींतील उत्पन्न, असतां जगांत उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक पदार्थांचा पुरवठा ह्या वसाहतींपैकी कोण- त्या ना कोणत्या तरी वसाहतीकडून त्यांना होईल; व कोणत्याहि प्रकारचा कारागिरीचा पदार्थ तयार करण्याचें मनांत आणिलें तर कोणत्या तरी वसाहतीस तो करितां येईल. पहा, धान्याची लागवड होण्याजोगी किती तरी जमीन कानड्यामध्ये ओसाड आहे; वेस्त इंदीज बेटांतून साखर, काफी व तंबाखू ह्यांचा पुरवठा होऊं शकेल, आस्त्रेलियांतून लोंकर व मास ह्यांचा, आसाम व हिंदु- स्थान येथून तांदुळ व चहा ह्यांचा, कानड्यांतून सागाचा आणि न्यू झीलंदमधून कातडी व मास ह्यांचा पुरवठा होऊ शकेल.

 ह्या वसाहतींपैकी प्रत्येकीपासून ब्रिटिश लोकांना कोणकोणत्या जिनसांचा पुरवठा होण्यासारखा आहे.