पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४०)

इंग्रज नाहींत. आस्त्रेलियाची लोकसंख्या ३० लक्ष आहे. सारांश, ब्रिटिश वसाहतींतील एकं- दर लोकसंख्या जवळ जवळ १ कोटि १० लक्ष - म्हणजे इंग्लंद, वेल्स व स्कातलंद ह्यांतील लोकसंख्येच्या - पेक्षां जास्त—आहे. ही लोकसंख्या आणखी एका दृष्टीनें ध्यानांत आणण्यासारखी आहे, ती अशी:-कानडा व वेस्त इंदीज ह्यांतील वस्ती आयर्लंदपेक्षा जास्त आहे; व आत्रेलियाची लोकसंख्या स्कातलंदपेक्षां कांहीं फारशी कमी नाहीं.

 हे लोकसंख्येचे आंकडे मोठाले आहेत; परंतु वसाहती अगढ़ीं भरून गेल्या आहेत, असे त्यांवरून सिद्ध होत नाहीं. अद्यापि वस्ती करण्यास त्यांत पुष्कळ जागा आहे. ग्रेट ब्रिटनाइतकी जर कानड्यांत दाट वस्ती झाली तर तेथें १०० कोटि, म्हणजे इंग्लंद, स्कातलंद व वेल्स ह्यांच्या लोकसंख्येच्या ३० पटीपेक्षा जास्त, लोक राहतील. तेव्हां इंग्लंदची लोकसंख्या दर ३० वर्षांनी दुप्पट ह्या प्रमाणानें ( उदाहरणार्थ, इंग्लंदची लोकसंख्या ठोकळ प्रमाणानें ३ कोटि धरिल्यास पहिल्या ३० वर्षांच्या अखेरीस ६, ६० वर्षांच्या अखेरीस १२, ९० वर्षांच्या अखेरीस २४,१२० वर्षांच्या अखेरीस ४८, व १५० वर्षांच्या अखेरीस ९६ कोटि, ह्या प्रमा- जानें ) वाढत चालली, असें मानिलें तरी देखील सर्व कानडा भरून जाण्यास १५० वर्षे लागतील. ब्रिटिश