पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४२)

त्याजविषयीं किंवा त्यांच्या वाढत चाललेल्या लोक समू- हाला राहण्यास त्यांचा जो उपयोग होत आहे त्याज- विषय सविस्तर हकीगत देणें हा प्रस्तुत पुस्तकाचा विषय नाहीं; म्हणून ह्या वसाहतींपैकी प्रत्येकीचा पृथक् पृथक् विश्वार न करितां त्यांचा एकदम विचार करूं.

 ब्रिटिश वसाहती त्या लोकांनी ताब्यांत कां रा- खिल्या पाहिजेत, हा ह्या प्रकरणांतील मुख्य विषय आहे; म्हणून त्याचा आतां विचार करूं. वसाहतींच्या संबंधानें इतर राष्ट्रांचे विचार काय आहेत, ती राष्ट्र वसा- हती ताब्यांत कां राखितात, व त्यांच्या उदाहरणावरून कोणकोणत्या गोष्टी इंग्लिशांनीं शिकण्याजोग्या आहेत, इत्यादि गोष्टींचा विचार केला असतां वसाहती ताब्यांत कां राखिल्या पाहिजेत, हे चांगले ध्यानांत येईल.

 वसाहती व सूळचे देश [त्या ज्या देशांतील लोकां- नीं स्थापिल्या ते देश] ह्यांचा संबंध अनेक रीतीनें ध्यानांत आणितां येतो. एखादा वृदा चांगल्या सुदृढ स्थितीत असावा; मूळ देशाचा व साहतींशी संबंध. त्याला फळ यावें;तें पक्क दशेस आल्यावर त्या वृक्षापासून गळून पडावें; सुदैवेंकरून तें सुपीक जमि- नीवर पडल्यास त्याचा एक नवाच वृक्ष बनावा, व आणखी नवीन वृक्षांची मालिका उतन्न करण्याचें साम- र्ध्य त्याच्याहि आंगीं यादें; अशासारखीच वसाहतींची स्थिति आहे असे कित्येक मानितात. कित्येक असे म्हण-