पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२५)

दिलीं. ह्यांपैकींच मार्तिनीक है एक बेट होतें; व ह्या एक- ट्याशींच इंग्लिशांचा गेल्या दोन वर्षांत जो व्यापार झाला होता, तेवढ्याचाच विचार केला तरी देखील तो फार महत्त्वाचा होता. ह्या मुदतींत इंग्लिशांनी ३,००,००० पौंड किमतीचा आपला माल ह्या बेटांत पाठविला होता. तेव्हां जो माल त्यांस अन्य तऱ्हेनें विकतां आला नसता, अशा वरील किमतीच्या मालाच्या खपाला हे एक ठिकाण झाले होतें. तेव्हां ही बेटें जिंकण्यापासून इंग्रजांस पैशाच्या संबंधानें तत्काळ फायदा होणार होता. व ह्यामुळे वरील युद्ध करण्यास फार सयुक्तिक कारण आहे, असे त्यांस वाटले असावें हें स्पष्ट आहे. आतां ह्या युद्धाला खर्च काय आला तो पाहूं. प्रतिवर्षी ज्या रकमा खर्च होत गेल्या त्यांशिवाय ह्या युद्धामुळे ५, २२, १९, ९१२ पौंडांची राष्ट्राच्या कर्जात भर पडली. आतां फायदे झाले तेः—[ १ ] कानडा इंग्लिशांस मिळाला; [ २ ] इंग्लिश वसाहतींच्या दक्षिण सीमेवरील प्लारिदा प्रांत त्यांस मिळाला; [ ३ ] आपल्या वसाहतींचा समुद्र किनाऱ्यापासून आंतल्या बाजूला अधिकाधिक विस्तार करण्याची संधी मिळाली; आणि [ ४ ] वेस्त इंदीज बेटांपैकी ग्रानाडा, सेंत व्हिन्सेंत, दोमिनिका व टोबागो हीं साखरेच्या उत्पन्नाचीं बेटे त्यांस मिळाली.

 ब्रिटिश वसाहतींसंबंधी इतिहासांतील अतिल- ज्जास्पद अशी जी हकीगत ती ह्यापुढे आली. ही हकी- गत तिसरा जार्ज ह्याच्या कारकीर्दीत घडली. ह्या राजा-