पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२६)

च्या कारकीर्दीत त्याच्या मूर्खपणामुळे इंग्लिशांच्या कित्येक वसाहती त्यांच्या हातून गेल्या; व त्या वसाहतींचेंच तेव्हांपासून 'युनायुतेद स्तेत्स' हें राष्ट्र बनलं. अमेरिकेंतील वसाहती ह्या वसाहती त्यांच्याहातून कशा ( युनाय्तेद स्तत्स ) CN इंग्रजांच्या हातून जातात. गेल्या त्याबद्दलचा इतिहास, इतःपर अशी गोष्ट न होण्यासाठीं कशा रीतीनें सावधगिरी ठेविली पाहिजे, हें समजण्यासाठीं लक्षपूर्वक ध्यानांत ठेवण्यासारखा आहे; व म्हणून ह्या विषयाच्या चर्चेपासून जरी ब्रिटिश लोकांच्या मनास दुःख होणार आहे, तरी तसं करणें अवश्य आहे. तेव्हां प्रश्न असा उसन्न होती कीं, ह्या वसाहती त्यांच्या हातून जाण्याचें कारण काय? प्रथमतः ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, पहिला चार्लस राजा ह्याच्या कारकीर्दीत उत्तरेच्या बाजूस ज्या वसाहती स्थापिल्या गेल्या, त्यांपैकीं बहुतेक वसाहतींचा इंग्लंदाशीं विशेष स्नेहभाव कधीच नव्हता. दुसरा चार्लस ह्याच्या कारकीर्दीच्या आरंभींच त्या वसाहतींनीं उघडपर्ण सांगितलें कीं, इंग्लैंदाशों आमचा संबंध शिष्टाचारापुरताच आहे; खरा कळकळीचा संबंध कांहीं नाहीं. अशी खरी स्थिति होती तर ह्या वेळेपर्यंत तरी त्यांनी इंग्लंदाशीं निकट संबंध कां ठेविला होता, असा प्रश्न सहजच उत्पन्न होती. ह्याचें उत्तर इतकेंच कीं, फ्रेंत लोक आपणांवर हल्ला करितील कीं काय अशी त्यांना भीति होती, व म्हणूनच त्या वसाहती इंग्लिशांच्या तंत्रानें चालत