पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२३)

सात वर्षाच्या युद्धा मुळे मिळालेल्या वसाहती.पार करण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करीत होते, हे दुसरे कारण होतें. येथें बारिक सारिक युद्धांचा विचार करणे नसून मोठ्या युद्धाचा विचार करणें आहे; म्हणून १७५६ पासून १७६३ पर्यंत झालेल्या सात वर्षांच्या मो- ठ्या युद्धाचाच विचार करूं. फ्रेंच लोक आणि आस्त्रि- यांतील लोक ह्यांनीं प्रशियाच्या फेदरिक राजावर जी स्वारी केली, ती स्वारी हेंच काय तें ह्या लढाईचें बाह्या- त्कारी कारण होतें. तथापि ह्या युद्धांत आपणहि प- डावें, असें इंग्लिशांना वाटलें; व अशा करण्यापासून त्यांचा काय फायदा झाला तें पाहिले पाहिजे.

 उत्तर अमेरिकेतील ज्या मोठाल्या सरोवरांचें पाणी सेंट लाग्न्स नदींत जातें त्या सरोवरांची ओळ ज्या प्रदेशांत पसरली आहे, तो प्रदेश वरील यद्धाच्या आरंभी फ्रेंचांच्या ताब्यांत होता; व मिसिसिपीच्या कांठचाहि प्रदेश त्यांच्याच ताब्यांत होता. ह्या दोन प्रदेशांमध्ये असणाऱ्या प्रदेशांवरहि ते हक्क सांगू लागले; म्हणजे इंग्लिश वसाहतींना उत्तर, दक्षिण आणि पश्चिम ह्या तिन्ही दिशांनीं ते अगदीं येऊन चिकटले; व ह्याप्र- मार्णे अत्लांतिक महासागर व आलेघानी पर्वतांची ओळ- ह्यांच्यामधील अरुंद समुद्रपट्टीच्या अलीकडे पलीकडे इंग्लिश वसाहतींतील लोकांस अगदीं होऊं द्यावयाचें नाहीं, असा त्यांचा पक्का निश्चय झाल्याचे दिसूं लागले.