पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२२)

युत्रेच येथे लिबरल पेक्षानें हैं देशांतील लोकांच्या वसाहती व फ्रेंचांच्या वसाहती ह्यां- ना इंग्लिशांविरुद्ध एकत्र होऊं न देणें. १७१३त तह होऊन हें युद्ध संपलें. युद्ध सुरू केलें होतें; व कान्सरव्हेटिव्ह पक्षानें हा तह करून ते बंद केलें; म्हणून ह्या तहांतील कलमें आपणांस फार लज्जास्पद आहेत, अशी ओरड लिबरल पक्षानें केली होती. आतां ह्या तहापासून इंग्लिशांस काय फायदे झाले, ते पाहूं. ( १) जाकोबाइट ह्यांना (स्टयूअर्ट घराण्यांतील राजांचा पक्ष घेणाऱ्या लोकांना ) कित्येक वर्षेपर्यंत फ्रेंचांकडून मदत होणें अशक्य झालें. (२) फ्रान्सच्या व स्पेनच्या वसाहतींना इंग्लिशांविरुद्ध एकी करितां आली नाहीं. [ ३ ] इंग्लिश वसाहतींना क- शाचेंहि भय राहिलें नाहीं. [ ४ ] ज्यांना हल्लीं नोवा स्कोशिया व न्यू ब्रन्झविक म्हणतात, तीं त्यांना एकत्र करितां आलीं; व न्यूफौंडलंड त्यांच्या ताब्यांत आलें. [५] भूमध्य समुद्रांतील मिनोर्का व जिब्राल्तर हीं ठिकाणें त्यांस मिळालीं. [६] गुलामांचा सर्व व्यापार त्यांच्या हातीं आला; व स्पेन देशांतील लोकांच्या वसाहतींस प्रतिवर्षी एक जहाज व्यापारासाठी पाठविण्याचा हक्क त्यांस मिळाला.

 ह्यानंतर स्पेन देशाशीं इंग्लिशांची युद्धे झाली. त्या लोकांनीं इंग्लिशांच्या वसाहतींतील लोकांशीं तंटे बखेड केळे हे ह्या युद्धाचें एक कारण होतें; व ते लोक आपल्या वसाहतींतील लोकांना इंग्लिश वसाहतींतील लोकांशीं व्या-


÷ हे ठिकाण आमस्तर्दामच्या आग्नेयीस २१ मैलांवर आहे.