पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२१)

 राष्ट्राला इंग्लंदानें जे एवढें कर्ज करून ठेविलें आहे, तें करण्याबद्दल एकहि सयुक्तिक कारण दाखवितां येण्यासारखें नाहीं, असें लोक वारंवार म्हणतात. ह्या राष्ट्रीय कर्जाला एकहि कारण नाहीं, हे म्हणणे फार आश्चर्यकारक दिसतें ! वसाहतींसंबंधी इंग्लिशांच्या इतकें विस्तीर्ण राज्य आजपर्यंत जगांत कोणाचेंहि झालेले नाहीं; ह्या त्यांच्या राज्याची ती किंमत होय, असे त्यांनीं समजले पाहिजे.

 इंग्लंदचें कर्ज वसाहतींसंबंधी राज्य स्थापण्यांत झालेले आहे, हे दाखविण्यासाठीं एक युद्ध उदाहरणार्थ बेऊं. ह्या युद्धांतील मुख्य लढाई x ब्लेन्हिम येथें झाली परंतु बडे लोक ह्या युद्धास प्रतिकूळ होते; व्यापारी लोक अनुकूळ होते. राष्ट्राच्या जमेंतून ह्या युद्धाकडे प्रतिवर्षी जो खर्च झाला, त्याशिवाय २,३४,०८, २३५ पौंड कर्ज काढावें लागले. आस्त्रिया देशच्या राजपुत्राला किंवा फ्रेंच राजपुत्राला स्पेन देशच्या मार्लबरो ह्यानें केलेल्या युद्धा- मुळे मिळालेल्या वसाहती. गादीवर बसण्याचा हक्क पोहोचतो किंवा नाहीं ह्या प्रश्नाचा वाद, हेंच काय ते ह्या युद्धाचें वरवरचें कारण होतें; परंतु खरी कारण पुढें लिहिल्याप्रमाणें होतीं:-( १) स्टयूअर्ट घरा- ब्याकडे पुन्हा राजसत्ता येऊं न देणें; व ( २ ) स्पेन


x ही लढाई आन राणीच्या कारकीर्दीत १७०४त इंग्लिश व फ्रेंच ह्यांच्यामध्ये होऊन हाँत इंग्लिशांस जय मिळाला. त्याचा मुख्य सरदार द्यूक ऑफ् मार्लबरो हा होता.ब्लेन्हिम हें जर्मनीत दान्युब नदीच्या कांठीं बव्हेरिया प्रांतांत पश्चिमेस खेडे गांव आहे. ११