पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२०)

होतें, व त्या सर्व कुटुंबाच्या चरितार्थाचा बोजा त्याच्या वरच होता. आतां त्याने काय करावें बरें ? त्याने असे केलें; पैसा कर्जी काढिला; व तो पैसा त्या दुसऱ्या लोकांत देऊन त्यांच्यापासून ते जमिनीचे तुकडे त्यानें विकत घेतले. ह्याचा परिणाम असा झाला कीं, कांहीं काळपर्यंत त्याच्या शिरावर त्या कर्जाचा बोजा पडला; परंतु तें कर्ज फेडण्याची त्याला उमेद होती. ह्याप्रमाणें तें फेडिल्यानंतर त्याला असें आढळून येईल की, आप- णास उत्तम प्रकारचे वतन मिळाले आहे, व आपण पूर्वीपेक्षां फार श्रीमान् झालो आहों.

 आतां हेंच उदाहरण विशेष मोठ्या प्रमाणावर ध्यानांत आणावें, व त्याप्रमाणेच इंग्लिशांनी हुबेहुब के- लें, असे समजावें. आपल्या वतनाचे ( वसाहतींचे ) तुकडे होतील, अशी त्या काळी त्यांना मोठी भीति होती, त्यांचे कुटुंबहि मोठें होतें ( इंग्लंदांतील सर्व लोक हेंच कुटुंब. व तेथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे ह्या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या चरितार्थाची कांही तजवीज होणें जरूर होतें. ) ; आणि हं वतन एकत्र राखण्यासाठी व ते वाढविण्यासाठी त्यांनी पुष्कळ पैसा खर्च केला व कर्जीहे काढिला. तेव्हां राष्ट्रदृष्टया ह्या जमाखर्चाचा विचार करणे म्हणजे जमेच्या व खर्चा- च्या सदरांची तुलना करून एकंदरींत आपला नफा झाला किंवा तोटा झाला, इतके पाहणें हेंच आहे.