पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११६)

 नंतर विल्यम ऑफ आरेंज ह्याच्या वेळी आरंभ होउन वाटलू येथील लढाईनें ज्याची समाप्ति झाली, तो युद्धाचा तिसरा काळ आला. १८वें शतक व १९व्या शतकाचा प्रारंभ ह्या काळांतील अति महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे हे युद्धच होय. १६८९ पासून १८१५ पर्यंतच्या १२६ वर्षांत इंग्लिशांनी ७ मोठाली युद्धे केली. ह्यांपैकी सर्वांत मोठें युद्ध १२ वर्षे सुरू होतें; व सर्वांत लहान ७ वर्षे सुरू होतें. हीं युद्धे प्रत्यक्ष फ्रान्स देशाशींच सुरू झाली, किंवा सुरू झाल्यानंतर लवकरच त्यांचा संबंध केवळ त्या देशाशींच राहिला. तेव्हां इंग्लिशांना फ्रेंचांशोंच तेवढे वारंवार लढण्याचे प्रसंग यावे, ह्याला राजांच्या आंगच्या महत्त्वाकांक्षैखेरीज कांहीं कारण अवश्य असले पाहिजे. इंग्लंदांतील बडे लोकांच्या किंवा इतर सभ्य लोकांच्या आंगच्या महत्त्वा कांक्षेमुळे हे प्रसंग आले असतील, असे कदाचित वाटण्याचा संभव आहे. तथापि हेहि म्हणणे खरें नाहीं, असे त्या वेळी घडलेल्या गोष्टींवरून उरतें. ह्या वरील १२६ वर्षां पकी बन्याच मुदतीत राज्यकारभार चालविण्याची मुख्य सत्ता बडे लोकांच्या हाती नव्हती; इतकेंच नव्हे, तर ते ह्या युद्धांग गतिकूळ होते. लिवरल पक्षाचे लोक ह्या युद्धांना अनुकूळ होते;व त्यांना व्यापाऱ्यांचा व मध्यम स्थितीतील इतर लोकांचा ह्या काम सल्ला होता. ह्या एकंदर स्थि- तीवरून अशी कल्पना होते की, हीं युद्धे व्यापारसंबंधा- ने झाली असावीं; व हीच कल्पना सयुक्तिक आहे. मा