पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११५)

फायदे होण्याचा संभव दिसल्यामुळेच त्या लढायांस पैसा खर्च करण्याची मंजुरी पार्लमेंटानें खुषीने दिली. परंतु फ्रान्स देश अजिबात कायमचा जिंकणे अशक्य आहे, अशी कांहों काळानें पार्लमेंटाची खात्री झाली. तेव्हां * डोंगर पोखरून उंदीर काढिल्याप्रमाण आपले कृत्य होईल, असे समजून पार्लमेंटानें तो नाद सोडून दिला. ह्या लढायांपासून तादृश फायदा झाला नाहीं, अशी पार्लमेंटाप्रमाणे राजांचीहि समजूत झाली होती, परंतु प्रजेची झाली नव्हती, व युद्ध सुरू ठेवण्याविषयीं तिची ओरड सुरूव होती. ही गोष्ट लक्षांत ठेवण्या- सारखी आहे.

 नंतर दुसरा काळ म्हणजे फ्रेंचांशी सख्य अस- ल्याचा काळ आला. आतां राजांच्या आंगची महत्त्वा- कांक्षा कमी झाली, म्हणून हा काळ प्राप्त झाला असे नाहीं; तर इंग्लिशांची फ्रान्स देश जिंकून घेण्याची कल्प- ना स्वप्नवत् झाली, बेलजम देश स्पेन देशाच्या ताब्यांत गेला, व इंग्लिश व्यापारी अमेरिकेत व्यापाराची ठाणी • बसविण्याच्या प्रयत्नांत गुंतले; ह्या कारणांमुळे फ्रेंच लो- कांबरोबरच्या लढाया बंद होऊन हा शांततेचा काळ आला. अमेरिका खंडांतील ह्या खटपटींमुळे इंग्लिशांस फ्रेंचांशी लढण्याचा प्रसंग आला नाहीं; तर स्पेन व हालंद ह्या देशांशी आला.


  • "The game is not worth the candle " ही

इंग्लिश पुस्तकांतील ह्या अर्थाची म्हण होय.