पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११४)

जार्ज व दुसरा जार्ज ह्यांच्या कारकीर्दीत राजांची सत्ता कमी असून पार्लमेंटाची सत्ता फार मोठी होती; इतकी मोठी होतो कीं, लढाईस लागणारा पैसा जर पार्लमेंटानें मंजूर केला नाहीं, तर राजांना क्षणभरहि लढाई करितां येत नव्हती. असे असतांहि त्या काळांत लढाया होत होत्या. तेव्हां राजांनी महत्त्वाकांक्षा हेंच लढायांचें कारण ह्या म्हणण्याची सत्यता कोठे राहिली ?

 आतां अशा प्रकारें केव्हां केव्हां लढाया होण्याचे व केव्हां केव्हां शांतता असण्याचें वास्तविक कारण काय ह्याचा विचार करूं. केसी व आजिंकूर येथील लढायांच्या वेळी पार्लमेंटानें त्या लढायांसाठी खुषीनें पैसा मंजूर केला; कारण त्या लढायांमुळे कांहीं फायदे होतील, असे त्यांस वाटत होतें. ते फायदे असे:- ( १ ) इंग्लंदचा राजा हाच जर फ्रान्सचा राजा झाला तर आपणांवरील कराचे ओझे हलके होईल; (२) त्या वेळी इंग्लंदांतील लोंकरीचे जिन्नस सर्वांत बेलजम देशा- मध्ये फार खपत होते, व फ्रेंच लोक तो देश जिंकून घेतील असा संभव त्या वेळी दिसत होता; आणि ( ३ ) क्याले व गिनी [ ह्या प्रांताचें मुख्य शहर बोर्डो ] हे प्रांत आपल्या ताब्यांत ठेवर्णे फार महत्त्वाचे आहे असे पार्लमेटास वाटत होतें; कारण त्या ठिकाणी इंग्लंदांतील लोंकरीचे जिन्नस पाठविल्यानें त्यांच्या मोबदला तेथून इंग्लिशांस दारूचा पुरवठा होणार होता. सारांश, हे ३