पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९२) खर्च होत असतां, तिची लेकरें उपाशी मेली तर यांत काय आश्चर्य आहे ! प्रत्येक नवा येणारा दुष्काळ मागल्याला बरा ह्मणवित आहे, आणि आश्चर्याची गोष्ट ही की, इ. स. १८७६।७७ च्या दुष्काळापेक्षां इ.स. १८९६। ९७ चा दुष्काळ जास्त भयंकर आहे, ही गोष्ट सर्व अधिकाऱ्यांस कबूल असतां पहिल्या सालापेक्षां धाऱ्याची सूट, दुसऱ्या सालाला कमी ! सन १८९९ चा दुष्काळही इ.स. १८९६।९७ च्या दुष्काळापेक्षां भयंकर आहे, ही गोष्ट तशीच कबूल असतां, सुटीचे प्रमाण वरील प्रमाणेच रहातें की काय, हे पहाणे आहे. सुटीचे प्रमाण दुष्काळाच्या विस्तारावर आणि भयंकरपणावर अवलंबून असले पाहिजे, ही गोष्ट अगदी लहान मूलही सांगू शकेल. परंतु सुधारलेल्या पाश्चिमात्य पद्धतीस याचा व्युत्क्रमच करणे बरे दिसत असावें, असे वाटते. असो. अशा रीतीने दुष्काळाचा भयंकरपणा दिवसेंदिवस वाढत जाण्यास कारण तरी वरील संपत्तीचा अवाढव्य ओघच आहे. - लोकांस यासंबंधांत सुचविण्याची गोष्ट म्हणजे लोकांनी आपल्या तक्रारी त्यांत अणुरेणु इतकीही अतिशयोक्ति न न करितां भक्कम पुराव्यासह वारंवार सरकारच्या कानावर घालाव्या. यासंबंधांत सर्वत्र औदासिन्य दिसून येते. असल्या प्रयत्नाला थोडक्या मुदतीत यश मिळण्याचा संभव नसतो. यश मिळत नाही, म्हणून निराश होऊन प्रयत्न सोडता कामा नये. राष्ट्रीय