पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९३) सभा व ब्रिटिश कमिटी यांस लागेल ती मदत करण्यास तयार झाले पाहिजे. आज आमाला मूक हिंदुजनांची दाद सरकाराजवळ लावण्यास हीच काय ती दोन साधने आहेत. या सभा हीच आमची तोंडे, हेच आमचे वकील आहेत. या करितां त्यांची हेळसांड उपयोगाची नाही. असो. आमचे दुसरे कर्तव्य असे आहे की, राष्ट्रीय सभा काय किंवा ब्रिटिश कमेटी काय, दार ठोठावून सरकारास जागे करण्याचा प्रयत्न करणार. परंतु सरकार जागे झाले नाही किंवा जागे होऊन त्यांनी झोपेचे सोंग घेतले, तर दार ठोठावणारांची दाद लागण्यास बराच अवधी लागेल या करितां दार ठोठावण्याचा हा प्रयत्न चालूच ठेवून आम्ही सध्यांच्या स्थितीत आपल्या स्वतःची सुधारणा आपणास कितपत करितां येईल, हे पाहिले पाहिजे. आम्हांस तर ती होण्याला बरेच दिवसांपूर्वी ज्ञानप्रकाश, सुधारक वगैरे पत्रांत ज्याची विशेष चर्चा चालू होती, त्या " राष्ट्रीय फंडा" वांचून दुसरा मार्ग दिसत नाही. यासंबंधांत रा. रा. गोपाळ अनंत भट यांनी एक निरपेक्ष भांडवल नांवाचें लहानसें पुस्तक लिहिले असून त्यांत केलेल्या सूचना फार महत्वाच्या आहेत. हे पुस्तक महाड येथील सद्वर्तनोत्तेजक सभेनें छापिले असून, केवळ टपाल हशील भर. ल्यास सदर सभेकडून ते के.णासही फुकट मिळते. ते सर्वांनी वाचावे आणि त्यांत सुचविल्याप्रमाणे “ निरपेक्ष भांडवल " जमविण्याचा प्रयत्न करावा. प्रथम असा प्रयत्न