पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९१) वाय दरसाल हजार रुपये किंवा त्यांपेक्षा अधिक पगाराचे कामगार सर्व हिंदुस्थानांत ३९०० ०असून त्यापैकी अकरा हजार नेटिव्ह आणि २८००० यूरोपिअन आहेत.या नेटिवांचा एकंदर पगार साडेचार कोटी असून गोऱ्या लोकांचा साडे बावीस कोटी रुपये आहे. याशिवाय रेलवेकडे मोठ्या पगारावर सव्वीसशे यूरोपिअन असून त्यांचा सालिना पगार एक कोटी वीस लक्ष रुपये आहे, तो निराळाच. रेलवे खात्यांत साधारण टिकिटें गोळा करण्याचे कामसुद्धां काळ्या कातडीच्या मनुष्यांस साधत नाही, असा समज असल्यामुळे, बारीकसारीक नोकरीवरही गोऱ्या लोकांचा सुळसुळाट झाला आहे. या सर्व लहानमोठ्या यूरोपियन नोकरांच्या शिलकी त्यांच्या बरोबर त्यांच्या देशांत जावयाच्या, मागे हिंदुस्थानांत एक पैही रहावयाची नाही. पूर्वीच्या मोंगल बादशाहीत हिंदु लोकांस मोठमोठी कामे मिळत असत. अकबराचा मुख्य प्रधान हिंदु असून त्याच्या सैन्यांत. मोठमोठाले हिंदु कामदार होते. आणि जे मुसलमान होते ते हिंदुस्थानचे कायमचे रहिवाशी झालेले होते. चाकरीची मुदत संपतांच चंबुगवाळें आटपून ते हिमालय उलट्न पलीकडे जात नसत. ह्यामुळे त्यांच्या शिलकेचा पुष्कळ भाग आम्हांमध्ये अनेकरूपाने पुनः परत येत असे. अशाप्रकारे आर्यसंपत्तीचा प्रचंड ओघ पश्चिमेकडे मोठ्या झपाट्याने वाहत असतां, आर्यभूमीच्या क्षीण हृदयाचे रक्त. अत्यंत वेगाने आंग्लभूमीच्या पुष्टीकडे.