पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पैसा येण्याची अनेक द्वारे सतत वहात असून येथील पैसा बाहेर नेणे हा मोठा गुन्हा समजला जात असे. हिंदुस्थानांत व ब्रह्मदेशांत त्या वेळी ह्या गुन्ह्याबद्दल सक्तीचे कायदे होते. " (मुसलमानी रियासत पा. ६१२ ). याप्रमाणे देशांतला पैसा बाहेर न जाऊ देण्याबद्दल खबरदारी घेतली असली मणजे प्रजेवर कराचा बोजा जरी थोडा जास्त असला, तरी तो सोसण्याचे तिच्या आंगीं सामर्थ्य असते. यालाच उद्देशून सुप्रसिद्ध वक्ते आणि राजपक्षाचे पूर्ण अभिमानी एडमंड बर्क साहेब पार्लमेंट सभेल एकदां ह्मणाले: The Tartar invasion was mis. chievous but it is our protection which destroys India" (" तातरी लोकांची खारी घातक होती खरी, तरी आमचें कृपाछत्रच हिंदुस्थानचा सत्यनाश उडवीत आहे.")ीमा सध्यांचा प्रकार अकबरादि मोंगल बादशहांच्या व्यवस्थेच्या अगदी उलट आहे. सध्या देशांतील संपत्ति बाहेर जाण्याची द्वारे पूर्णपणे खुली असून ती देशांत येण्याच्या मार्गास मात्र ठिकठिकाणी दट्टे मारिले आहेत. एकंदर सर्व कर मिळून उत्पन्न होणाऱ्या पंचाण्णव कोटी रुपयांपैकी मि. हिंडमन म्हणतात त्याप्रमाणे तीन कोटी पौंड झणजे हल्लींच्या भावाने पंचेचाळीस कोटी रुपये, कर्जाचे व्याज, इंडिया ऑफिसचा खर्च, होम चार्जेस, पेन्शन फंड वगैरेंच्या रूपाने दरसाल देशांतून बाहेर चालले आहेत. याशि