पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काशात जाते व तळी, विहिरी वगैरे जलाशय कोरडे पडतात, परंतु पावसाळ्यांत पहिल्या पेक्षाही अधिक पाणी पडून पुनः ती पाण्याने डबडबतात, त्याप्रमाणेच कराच्या रूपाने जरी क्षणभर रयतेजवळचा पैसा देशी राजांच्या खजीन्यांत गेला, तरी तो पुनः नानारूपांनी प्रजेमध्येच परत येतो. अकबरादि देशी बादशहांच्या कारकीर्दीत असाच प्रकार होत असे. त्यांनी कराच्या रूपाने घेतलेला पैसा पुनः रयतेकडे येई, आणि त्यामुळे ती चांगली सुखी असे. जहांगीर आणि औरंगजेब यांच्या कारकीर्दीत हिंदुस्थानांत प्रवास करण्याकरितां बर्निअर नावाचा एक प्रवासी आला होता. तो ह्मणतोः " पुष्कळ लोकांचा समज आहे त्याप्रमाणे मोंगल बादशाहांच्या खजिन्यांत कधी विशेष शिल्लक राहत नसे. जसें त्यांचे उत्पन्न मोठे होते, तसा त्यांचा खर्चही पण दांडगाच होता. खजीनदार जसा एका हाताने पैसे जमा करितो, व लगेच दुसऱ्या हाताने ते खर्च करितो त्याप्रमाणेच या बादशहांची स्थिति होती." यावर कोणी म्हणेल की, इंग्रजांजवळ कोठे शिल्लक आहे ? हिंदुस्थान सरकाराला तर जवळ जवळ दोन अब्ज रुपये कर्ज आहे. गोष्ट खरी आहे. आमचे सांप्रतचे सरकार मोंगल सरकारांपेक्षा फार खर्चिक आहे, इतकेच नव्हे, तर त्यांचा खर्चिकपणा आमच्या अवसानाच्याही बाहेर आहे. रे. टेरी नांवाचा प्रवासी इ. स. १६१५ पासून इ.स १६१८ पर्यंत हिंदुस्थानांत होता. तो ह्मणतोः “ देशात