पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४८) माणसी ६१५ रुपये उत्पन्न असून, हिंदुस्थानांत अगदी सरकारी रीतीने प्रसिद्ध झालेला आंकडा घेतला तरी ते अवघे २७ रुपये आहे. कराचें मान मात्र याच्या उलट! इंग्लंडांत उत्पन्नावर शेकडा सहा या मानाने कर असून येथे तो शेकडा १६% आहे. हिंदुस्थान देश अत्यंत दरिद्री असून त्यावर विलक्षण कराचा बोजा बसल्यामुळे त्याचे दारिद्रय दिवसेंदिवस अधिक वाढत चालले आहे. जेथें संपत्ति आहे, कर देण्याचे सामर्थ्य आहे, तेथे तो अधिकआगळा बसविला तरी शोभतो, व सोसतो; परंतु जेथें त्राण नाही, तेथे तो बसविणे म्हणजे कर भरणारांस जाणून बुजून धुळीला मिळविण्याचा प्रयत्न करणेच आहे. तत्कालिन् कोणत्याही यूरोपियन राजांस आपल्या राज्यव्यवस्थेत मागें सारणारा हिंदुस्थानचा मोंगल बादशहा अकबर, याने आपल्या प्रजेवर बसविलेल्या करांचे मान या पेक्षाही जबर होते, हे दाखविण्याचा हंटर साहेबांनी फार मोठा प्रयत्न केला आहे. परंतु त्या वेळच्या लोकांची सांपत्तिक स्थिति सध्यांच्या हजारपट चांगली होती, असे त्या वेळी व त्यानंतर इकडे आलेल्या यूरोपियन प्रवाशांनी दि. लेल्या हकीकतीवरून स्पष्ट होते. लोकस्थिति चांगली असल्यावर कराचे प्रमाण मोठे होते ही गोष्ट यदाकदाचित् सिद्ध झाली, तरी त्यांत राज्यकर्त्यांवर कसा दोष येतो व प्रजेचे काय नुकसान होते, हे समजत नाही. ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये सूर्यकिरणांनी पाण्याची वाफ होऊन आ