पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८७) असो. अशा रीतीने सुशिक्षित लोक, शेतकरी आणि सावकार जर आपआपली कर्तव्य बजावतील तर आज दिसत असलेली दैना नाहीशी होऊन शेतकरी सुखाने नार्दू लागतील, आणि आमच्यामध्ये पूर्वापार चालत आलेली ह्मण उत्तम शेती,' ती खरी ठरेल. का अकरावें कारण-हिंदुस्थानचा बहुजनसमाज म्हणजे शेतकरी लोक, आणि त्यांच्या दारिद्रयाचे मुख्य कारण ह्मणजे दरसाल तीस लक्ष रुपयांनी वाढत असलेला जमीनीचा सारा होय, हे पूर्वी सांगण्यांत आलेच आहे. आतां या शेतकन्यांवांचून बाकी राहिलेले तरी लोक चांगले धनाढ्य आहेत काय ? या प्रश्नाचेही उत्तर दुर्दैवाने 'नाहीत, असेंच द्यावे लागते. मि. टाटा, पेटिट आणि सर मंगलदास यांच्यासारख्या लक्ष्मीपुत्रांची गोष्ट वेगळी; परंतु रोज चांगले सुग्रास अन्न, मनासारखें वस्त्र आणि आनंददायक घर, तरी किती लोकांस रहावयास मिळतें ! हजारांत एकालाही नाही, असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. अडॅम स्मिथ साहेबांनी एके ठिकाणी म्हटले आहे: " ज्या समाजांत पुष्कळ लोक भिकारी आणि दुःखी असतात, त्या समाजाला कधीही ऊर्जित दशा येत नाही, व तो समाज कधीही सुखी असत नाही. हिंदुस्थानची स्थिति सध्या अशीच झाली आहे. सर्व युरोप खंडांत अत्यंत दरिद्री तुर्कस्थान देश, तोही आमच्यापेक्षा तिप्पट श्रीमंत आहे; आणि इंग्लंड आमच्या बेवीसपट श्रीमंत आहे. इंग्लंडांत सरासरीने दर