पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८६) करावें ? आपण आपले तन मन धन खर्ची घातल्याशिवाय आपल्या हातून कोणतेही महत्कार्य व्हावयाचे नाही, ही गोष्ट आज कोणाला शिकविली पाहिजे असे नाही. नुसत्या पोपटी बडबडीने आम्हांला इंग्रजांची बरोबरी कधीच करितां येणार नाही. आपण आपल्या कळकळीने आणि आत्मीयज्ञानाने आपणांस हाती घेतलेल्या कामाची योग्यता पूर्णपणे कळली आहे, असे दाखविले पाहिजे. ह्या देवाच्या कोठाराचे महत्व शेतकऱ्यांच्या मनांत भरवून देते वेळी आमच्या सुशिक्षित लोकांनी आणखी दुसरें एक काम केले पाहिजे, ते हे की, सध्यां न्यायाच्या कोर्टात गेल्याने स्टॅप वगैरेच्या रूपाने त्यांचे किती नुकसान होते, हे त्यांस समजावून देऊन होईल तितकें करून सावकारावर कोर्टात जाण्याची पाळी आणूं नका. सावकार कोर्टात गेले तरी खर्चाचा बोजा तुह्मांवरच बसणार आणि मग तो तुमचे घरदार विकून आपले कर्ज उगवून घेणार. करितां तो कोर्टात जाण्यापूर्वीच त्याचा निकाल लावा, असे त्यांस सांगावें, व सावकारांस लवादमार्फत निवाडा करून त्याची कायदेशीर बजावणी करितां यावी ह्मणून फक्त तो दिवाणी कोर्टात नोंदून घेण्याविषयी बोध करावा. म्हणजे शेतकरी बऱ्याच खर्चाच्या बोजांतून सुटून त्याचा फायदा होईल. या कामाकरितां दर तालुक्यास सावकार व कुळे यांच्या प्रतिनिधींची एक पंचकमिटी असावी व त्यांनी या किरकोळ फिर्यादीचे निकाल करीत जावे. हा एक स्वावलंबनाचा धडा या दृष्टीनेही या व्यवस्थेपासून बराच फायदा होईल.