पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८५) कोणी सवा पायली, याप्रमाणे गल्ला आणून त्यांत ठेवावयाचा. या गल्ल्याची सर्व व्यवस्था गांवचा पाटील आणि पंच यांनी राखावयाची. पुढे पावसाळ्यांत जेव्हां जरूर लागते तेव्हां ज्याने जितकें धान्य दिले असेल तितकें त्यांस , देवाचे म्हणून मणास एक पायली व्याजाने कर्जी घालावयाचें. मराठे लोकांत अद्यपि देवाविषयी फार श्रद्धा असल्यामुळे आपले हित समजून लोक हे धान्य ते बुडविणार नाहीत. जातीचीही बरीच बंधनें अद्यापि त्यांच्यांत आहेत. म्हणून जो हे धान्य बुडवील, त्याचे हुक्कापाणी बंद करावयाचे, असा निर्बध केल्यास धान्य बुडण्याची मुळींच भीति राहणार नाही. आणि जो तो शेतकरी नेलेलें धान्य व्याजासुद्धां परत आणून देईल. मागच्या साली झालेला खर्च किंवा आलेली बूड व्याजाच्या गल्ल्यांतून कापून घेऊन बाकीचे धान्य देवाच्या कोठारांत ठेवावयाचें व नवे धान्य मागच्या सालाप्रमाणेच गोळा करावयाचे. असा क्रम काही वर्षे चालल्यास शेतकरी कर्जमुक्त होण्याची बरीच आशा आह.. - आतां ही क्लप्ति जरी योग्य असली तरी शेतकऱ्यांच्या मनांत ती भरावी कशी ? हे मनांत भरवून देण्याचे काम सुशिक्षित लोकांचे आहे. त्यांनी आपल्या महात्म्या ऋषीचाआमच्या नवव्या परिषदेचे अध्यक्ष मि. दादाभाई यांचात्या वेळचा उपदेश लक्षांत वागवून हे काम केले पाहिजे. ते म्हणाले: “ आमा सुशिक्षित लोकांपुढे असा एक प्रश्न आहे की, आम्ही आपले देशबांधवांसंबंधाचे कर्तव्य कसे