पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असें ह्मणणं, ह्मणजे हिंदुस्थानचे काहीही होवो, आमाला त्याचा विचार कर्तव्य नाही, असें ह्मणण्यासारखेच आहे. दाक्षिणेतील चार जिल्ह्यास लागू केलेला शेतकी अॅक्ट मुंबई इलाख्यांतील बाकीच्या जिल्ह्यांस लागू करावा किंवा नाही, या प्रश्नाचा विचार करण्याकरितां थोड्या दिवसांपूर्वी एक कमिशन नेमण्यांत आले होते; त्या वेळी "शेतकऱ्यांच्या पेढ्या काढिल्यावांचून सदर अॅक्टापासून शेतकऱ्यांस विशेष फायदा होणार नाही." असा कै० न्यायमूर्ति रानडे यांनी आपला अभिप्राय दिला होता. नामदार पारख यांनी आपल्या सातारच्या भाषणांत सरकारास दुष्काळ निवारण्याकरितां सुचविलेल्या उपायांत या सूचनेचा अंतर्भाव केला आहे, यावरून दुसरी सूचनादेखील फार महत्वाची आहे, ही गोष्ट कोणास नाकबूल करितां येणार नाही. - शेतकऱ्यांची स्थिति सुधारण्यासंबंधाने लोकांचे कर्तव्य काय आहे, हे रावसाहेब गोपाळ अनंत भट, बी.ए. सब जज्ज कुमठा, यांनी काही दिवसांपूर्वी जितक्या स्पष्ट रीतीने लोकांपुढे मांडले होते, तितकें तें दुसऱ्या कोणीही आजवर मांडलेले नाही. थोड्या दिवसांपूर्वी टाइम्समध्ये रावसाहेब भटांच्या तत्त्वांवरच बेहरे नांवाच्या कोणी सद्गृहस्थांनी काही सूचना केल्या होत्या. परंतु दोहोंचाही इत्यर्थ एकच आहे. प्रत्येक खेड्याला एक देवाचे कोठार काढावयाचे आणि त्या गावांत राहणाऱ्या सर्व शेतक-यांनी मळण्या होतांच आपआपल्या मगदुराप्रमाणे कोणी दोन मण, कोणी मण,