पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यांतच देशांतील निकस ह्मणजे शेतकीस नालायक जमिनीचा अंतर्भाव करितां येईल. । ४ दुष्काळ पडण्याचे चौथे कारण मटले ह्मणजे, राब, खत, आऊतें वगैरे शेतकीस लागणाऱ्या कृत्रिम साधनांची | टंचाई, अभाव किंवा दुर्दशा हे होय. ५ देशांतील जमीन चांगली कसदार असली, तीत धान्य, ऊस, कापूस वगैरे वाटेल तो जिन्नस पिकण्यासारखा असला, व पाऊसही चांगला बेताचा पडत असला तरी देखील 'गाढवाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या. या न्यायाने शेतकीविषयी, अज्ञान शेतकऱ्यांच्या हातांत अशी जमीन पडल्याने, जमिनीत तिच्या मगदुराप्रमाणे पीक न निघून दुष्काळ पडतो; ह्मणून शेतकन्यांस त्यांच्या धंद्याचे ज्ञान नसणे, हे सामान्यतः दुष्काळ पडण्याचें पांचवें कारण मानण्यास हरकत नाही. ६ जमीन कसदार असली, पाऊसपाणी बेताचे आणि वेळच्यावेळी लागले, व शेतकीसंबंधी उत्कृष्ट ज्ञान असले, तरी देखील सरकारचे जमीन महसुलासंबंधाचे नियम अन्यायाचे आणि जुलमाचे असतील, तर शेतकऱ्यांस आपले सर्वजान गुंडाळून दुष्काळास बळी पडावे लागेल. ह्मणून हे नियम अशा प्रकारचे अन्यायाचे व जुलमाचे असणे, हे सामान्यतः दुष्काळ पडण्याचे सहावे कारण आहे. ७ दुष्काळ पडण्याचे सातवें कारण मटले झणजे, देशाच्या एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांतात किंवा त्या देशांतून दुसन्या देशांत, गमागम ठेवण्याची साधने नसणे हे होय. अशी साधनें असली झणजे एका प्रांतांतील पिकाची बूड