पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदुस्थानांतील दुष्काळ. ज ज्या काळी लोकांमध्ये आपल्या नित्याच्या अवश्य गरजा भागविण्याइतके ही त्राण राहत नाही त्या काळास दष्काळ असें ह्मणतात. हा काळ किंवा अशा प्रकारची स्थिति कोण त्याही देशास येण्याला जी सामान्य कारणे आहेत ती प्रथम देऊन या निबंधांत हिंदुस्थानांतील दुष्क ळाविषयींच विचार करावयाचा असल्यामुळे त्यांपैकी कोणती कारणे येथे किती प्रमाणाने लागू पडतात ते पाहूं. १ शेतकीस अवश्य असणान्या पर्जन्यापेक्षा अधिक पर्जन्य लागून, उथव बुडीने पिकाची खराबी होणे, किंवा कमी पर्जन्य लागून सुकव्याने पीक न येणे हे एक दुष्काळ पडण्याचे सामान्य कारण होय. ___२ दुसरें दुष्काळ पडण्याचे सामान्य कारण ह्मणजे टोळ धाड किंवा पाखरांची धाड हे होय. या धाडीमुळे कितीही चांगले पीक आले, तरी ते शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही, आणि ह्मणून दुष्काळ पडतो. ३ ज्या देशाची उपजीविका लोखंड, सोने, तांबे वगैरे खनिज धातु, दगडी कोळसे, रॉकेल वगैरे खाणीताल द्रव्ये किंवा मोती, पोवळी वगैरे समुद्रांतर्गत वस्तूंवर अथवा हस्त कौशल्य आणि यंत्रसामुग्री यांनी बनविलेल्या जिनसाच्या व्यापारावर अवलंबून नसून, बऱ्याच अंशी शेतकीपासून उत्पन्न होणाऱ्या कच्या मालावरच अवलंबून असते, तेथे दुष्काळ पडण्याचा बराच संभव असतो. ह्मणून देशाचें भौतिक दारिद्य हे दुष्काळ पडण्याचे तिसरे कारण आहे.