पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुसन्या प्रांतांतील धान्य नेऊन, किंवा परदेशचे धान्य आणून भरून टाकितां येते. ८ ज्या देशांत नित्याच्या गरजांस अवश्य लागणारे अन्नादि पदार्थ उत्पन्न होऊनही ते व्यापाराकरितां परदेशी रखाना होतात, त्या देशांत दुष्काळ पडण्याचा अधिक संभव असतो; ह्मणून असले पदार्थ मागचा पुढचा विचार न करितां, परदेशी पाठविणे हे सामान्य करून दुष्काळ पडण्याचे आठवें कारण आहे. ९ इंग्रजादि बलाढ्य यूरोपियन राष्ट्रांच्या फाजील अधिकारतृष्णेमुळे जरी क्वचित् प्रसंगी लढाया उत्पन्न होतात, तरी एकंदरीने पाहिले असतां, सध्यांचा काळ झणजे शांततेचा काळ होय. तेव्हां या काळांत प्रत्येक देशांतील लोकसंख्येचे मान मोठया सपाट्याने वाढत चालले आहे; यांत कांहीं नवल नाही. अशा प्रसंगी ज्या देशांतील लेक नानाप्रकारच्या युक्त्यांनी परदेशचा पैसा आपल्या देशांत न आणितां, किंवा परक्या देशांत व्यापार वगैरे न चालवितां देशातल्या देशांत माशा मारीत बसतील, त्या देशांत अधिक लवकर दुष्काळ पडेल. ह्मणून दुष्काळ पडण्याचे नववे कारण ह्मणजे उद्योगाचा आणि परदेशगमनास लागणाऱ्या धाडसाचा अभाव हे होय. १० जमिनीची मशागत होऊन, तीत चांगले पीक येण्यास शेतकऱ्याजवळ नांगरकीची पुष्कळ जनावरे असून ती चांगली सदृढ असली पाहिजेत. शेतक-यांस दुवक्ता चांगले पोटभर अन्न आणि जाडे भरडे तरी आंगभर वस्त्र मिळाले पाहिजे, त्याच्या अंगांत चांगली ताकद असली पाहिजे, शेतांत पेरण्यास पुरेसे आणि चांगले बी मिळाले