पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८२) म वेडरबन साहेबांनी सुचविल्याप्रमाणे “ व्हिलेज इन्का. यरी" (खेड्यांतील लोकांच्या स्थितीची चौकशी ) करण्याकरितां एक कमिटी नेमून तिच्या सूचनेप्रमाणे तजविजी करणे हाच होय. हा उपाय सदर साहेब इ.स.१८९७ च्या दुष्काळापासून सुचवित आहेत. परंतु परकीय लोकांच्या पार्लमेंटमध्ये आमच्या कळवळ्याची माणसे कितीशी मिळणार ? ता. ३ एप्रिल रोजी ८३ लोकांचे मताधिक्य होऊन ही सूचना नापसंत झाली. तथापि या सभेत सदर प्रसंगी असलेल्या २२७ सभासदांपैकी ७२ या सूचनेस अनुकूल होते. यावरून सदर सूचनेची अवश्यकता व महत्व वाचकांच्या लक्षात आल्यावांचून राहणार नाही. शेतकऱ्यांची आणि त्यांच्या द्वारे शेतकीची स्थिति सुधारण्याकरितां, अर्थात् दुष्काळाला प्रतिबंध करण्याकरिता सरकारास करावयाची दुसरी सूचना ह्मणजे त्यांनी जिल्ह्यानिहाय शेतकरी लोकांस कर्ज देण्याकरितां पेढ्या स्थापन केल्या पाहिजेत. सावकार लोकांचा दोष जर कांहीं असेल तर तो हाच आहे की, दिवसेंदिवस त्यांच्या दारी कर्ज मागणारांची गर्दी उडाल्यामुळे ते ज्यास्त व्याज घेतात किंवा क्वचित् प्रसंगी त्यांच्या जमीनी आपल्या घरांत शिराव्या म्हणून कांहीं सावकार खोटेनाटे हिशेब करतात. परंतु हे टाळावयाचे म्हणजे शेतकऱ्यांची जुनी कर्जे फेडून त्यांस सावकाराकडे जाण्याचा प्रसंगच येऊ द्यावयाचा नाही. याच करितां सरकारांतून पेढ्या स्थापण्यांत आल्या पाहि