पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८१) दोन महिने कर्ज आणूनही अर्धपोटी राहिल्यावांचून काढणे आतां अशक्य झाले आहे. आदल्या वर्षी कर्जीदाणे किंवा दाणे देण्याच्या कराराने रुपये काढावयाचे आणि पीक तयार होतांच प्रथम सावकाराची आणि मग सरकाराची भर करून आठ महिने मोलमजूरीवर कसा तरी गुजारा करावयाचा, असा प्रकार झाला आहे. गांवांत जे धान्य तीन पायली भावाने आज मिळते, ते नऊ पायली घेण्याच्या कराराने आमचे सावकार किंवा रॉलि ब्रदर्ससारख्या जगद्विख्यात कंपनीचे एजंट शेतकऱ्यांना पैसे देतात आणि केव्हां केव्हां तर त्यांची उभी पिकेंच एकदम ठराव करून त्यांजपासून घेतात व शेतकरीही गरजू असल्यामुळे या लोकांच्या सर्व अटी कबूल करून आलेले दिवस काढितात. या. मुळे आमच्या शेतकऱ्यांस आतां नेहमींचाच दुष्काळ आला आहे. ते फक्त धान्य पिकविण्याचे मालक. फायद्याचे मालक व्यापारी. न अशी शेतकऱ्यांची दुर्दशा उडाल्यामुळे सदर कारणांत सांगितल्याप्रमाणे शेतकीची अनास्था होऊन आमच्या दुष्काळांस साहाय्य होत आहे. ही स्थिति सुधारण्याकरितां कितीही बिले पुढे आली आणि डेक्कन अग्रिकलचरिस्टस अक्टाप्रमाणे शेतकऱ्यांस कर्जबाजारांतून मुक्त करणारे कितीही कायदे पास झाले तरी त्यांपासून विशेष उपयोग होणार नाही. ती सुधारण्याचा खरा मार्ग मटला म्हणजे पार्लमेंट सभेस सर वुइल्य